Category Archives: Uncategorized

Home

नावाविषयी माहिती

माझे गांव वरुड (बिहाडे) हे आहे वरुड (बिहाडे) हे गांव सातपुडा पर्वताच्या पायथ्याषी आहे.  वरुड गावातील सर्व लोक एकमेकांस सहायता करण्यास तयार असतात

गावामध्ये रामनवमी दसरा विजयादषमी, पोळा, असे धार्मिक व सांस्कृतिक उत्सव राबविले जातात.  तसेच गावात बालनाटय, वादविवाद स्पर्धा, कृच्चि चर्चा सत्र, पालक मेळावे, गणेषोत्सव, दुर्गादेवी उत्सव अषी मनोरंजनात्मक उत्सव साजरे केले जातात.  तसेच दरवर्च्ची एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जन्म उत्सव धार्मिक व मनोरंजनात्मक उत्सव राबवुन साजरा केला जातो.

गावात संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय आहे.  त्याचा सर्व गावकरी व विद्यार्थी उपयोग घेतात.  वाचनालयात स्पर्धा परिक्षांबद्दल मार्गदर्षनपर पुस्तके आहेत.  त्याचा युवक वर्ग फायदा घेतात.  वाचनालयात एकूण १५ नियतकालिके येतात.  तसेच वाचनालयामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात.  वाचनालयातील एकूण सर्व पुस्तकांची संख्या ९७० आहेत.