बचत गट
गावात एकूण ११ बचत गट आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत.
बचतगटाचे नांव अध्यक्षांची नांवे
नवयुवक स्वयसहायता बचत गट श्री. संजय वा. जवंजाळ
जिजावू स्वयंसहायता बचत गट सौ. पुच्च्पाताई वि. बिहाडे
माऊली स्वयंसहायता बचत गट श्री. विजय कि. बिहाडे
संत वासुदेव स्वयंसहायता बचत गट श्री. भुजिग ना. दुतोंडे
राधा-स्वामी स्वयंसहायता बचत गट सौ. नलिनी र. ताथोडे
एकता स्वयंसहायता बचत गट श्री. विजय ह. जायले
समर्थ स्वयंसहायता बचत गट श्री. मधुकर ना.धुर्वे
सावित्रीबाई फुले स्वयंसहायता बचत गट सौ. रमाबाई चं. खिराडे
रुख्मिनी स्वयंसहायता बचत गट सौ. अनिता नं. दुतोंडे
रमाबाई स्वयंसहायता बचत गट सौ. ताईबाई भि. खिराडे
राधा-स्वामी स्वयंसहायता बचत गट सौ. वंदना न. ताथोडे.
गावामध्ये वरीलप्रमाणे बचत गट कार्यरत आहेत.
राधा-स्वामी स्वयंसहायता महिला बचत गट
वरील गटामार्फत अंगणवाडीला नियमित पोच्चण आहाराचे वितरण केले जाते. बचत गट अंगणवाडी अभियान राबविते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येतो. तसेच किषोरवयीन मुलींंकरिता विविध उपक्रम राबविले जातात. गटाचे अध्यक्ष सौ. वंदना नरेंद्र ताथोडे गटामार्फत अनेक कार्यक्रम राबवितात. आपले पर्यावरण अभियानात गटामार्फत वृक्षोरापण करण्यात आलेले आहे.
नवयुवक स्वयंसहायता बचत गट
नवयुवक स्वयंसहायता बचत गटात एकूण ११ सभासद आहेत. या गटाची स्थापना जानेवारी २००३ मध्ये झालेली आहे. या गटाची स्थापना गावामध्ये सर्वांत प्रथम झालेली आहे. या गटाला सेन्ट्रल बॅंकेमधून आर्थिक सहाय्य मिळालेले आहे. त्यामधून गटाने म्हषी विकत घेतल्या आहेत. त्यापासून दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यापासून गटाला आर्थिक सहाय्य प्राप्त करुन बॅंकेची परतफेड करण्यात आली आहे.
गटाचे अध्यक्ष श्री. संजय वासुदेव जवंजाळ हे गटावर देखरेख करुन कार्य सुरळीत पार पाडतात. गटामार्फत गांढूळ खत निर्मिती करण्यात येत आहे.
गटामार्फत गावात ग्रामसफाई करण्यात येते. तसेच पाण्याचा वापर व पाण्याचे नियोजन कषाप्रकारे करावे याविच्चयी गट माहिती देते. बचत गटामार्फत वृक्षारोपन करण्यात येते. तसेच विविध खेळाचे आयोजन करण्यात येते. बचत गट दरवर्च्ची नवदुर्गा उत्सव साजरा करतो. त्यामध्ये अनेक षिबिरे आयोजित करतो. तसचे वरील गटातील काही गट हे द्योळीपालन, गांढूळ खत निर्मिती करतात.
तसेच काही महिला बचत गट हे मेहंदी उत्पादन, घरगुती उदयोगधंदे करतात. वेळ प्रसंगी सर्व गट एकमेकांस सहाय्य करतात. गावात बचत गटांना प्रषिक्षण देण्याकरिता कृच्ची अधिकारी बॅंकेचे कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी तसेच उदयोग करणारे अनुभवी कर्मचारी ट्रेनर म्हणून प्रषिक्षण देण्याकरिता येतात.