माहिती

जलस्त्रोत

गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प पूर्णपणे राबविण्यात आलेले आहे. गावात पाण्याची भरपूर प्रमाणात साठवण केली जाते.  गावापासून ४० किलोमीटर अंतरावर वारी हनुमान-भैरव गढ येथे वान नदिवर धरण बांधलेले आहे.  त्याचा उपयोग गावात द्योती करण्याकरिता होतो.  तसेच गावात पाण्याचे प्रजन्यमान हे ५८१ मि.मि. आहे.  गावात एकूण उपलब्ध पाणी हे ८४२३८०००० लिटरर्स आहे.  तसेच गावात विहिर हातपंप , नळ , कुंपन नलिका या प्रकारचे जलस्त्रोत गावात उपलब्ध आहेत.  त्याचा संपूर्ण गावाला उपयोग होतो.

प्राणिसंपदा

गावामध्ये गाई, म्हैस, म्हषी, घोडा, द्योळी अषा प्रकारचे प्राणी आहेत.  त्यातील प्राण्यांद्वारे द्योतीची मषागत केली जाते.  तसेच त्यांचा वाहनाकरिता उपयोग केला जातो.  गावातील संपूण्र एकूण प्राणी संख्या ही ९७० आहे.

पिक व फळबाग

पिंकाची फळबागांची माहितीगावातील द्योतीमध्ये गहू, हरभरा, मुग, उडिद, तूर, सोयाबिन, कापूस, तिह यासारखी पिके घेतली जातात.  तसेच केही, पपई, संत्री , बोर अषा प्रकारची फळे घेतली जातात.